‘महिलांचे रक्षण करणारे रक्षकचं भक्षक झालेत का’? चित्रा वाघ यांचा सवाल

0
40

महिलांवरील अत्याचार हे दिवसेंदिवस वाढतच आहे. कितीही महिला सक्षम झाल्या तरी एक प्रश्न नेहमी सतावतो कि, समाजात स्त्री सुरक्षित आहे का? अनेक जिल्ह्यांमधून दररोज काही घटना ऐकू येतात. सध्याची घटना म्हणजे उस्मानाबाद शहरात एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. कारण, बंदुकीचा धाक दाखवून उस्मानाबाद पोलिस खात्यातील काम करणारा हरीभाऊ कोळेकर या पोलिसाने वारंवार बलात्कार करत असल्याचे त्या सुसाईड नोटमध्ये लिहीले आहे.

त्यावर भाजप प्रदेश उपाध्यक्ष ‪चित्रा वाघ यांनी “महिलांचे रक्षण करणारे रक्षकचं भक्षक झालेत का? असा सवाल उपस्थित केला आहे.  महिला तक्रार घेऊन आली की ती दाखल करानंतर चौकशी करण्याबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स ह्या @MahaPolice  ना लागू नाहीयेत का?

तसेच जळगावच्या महिला सुधारगृहातील मुलींना नग्न करून नाचवण्याच्या अतिशय संतापजनक प्रकाराची दखल तिथल्या प्रशासनाला का घ्यावीशी वाटली नाही कि इथेही झाकाझाकी? असा शब्दात चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.