आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण

0
46

राज्यात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. गुरुवारी बऱ्याच दिग्गज नेत्यांना कोरोनाची लागण झाली, त्यात आणखी एका नावाची भर पडली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. राजेश टोपे यांनी खुद्द ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. राजेश टोपे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता त्यांची तब्येत ठीक असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. तसंच लवकरच ते कोरोनावर मात करत परत कामाला लागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
कोरोनाबाबत महाराष्ट्रात एकूणच वाईट परिस्थिती निर्माण होत आहे. मुंबईतही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दोन दिवसाआधी मुंबईत 700 नवे रुग्ण आढळून आले होते, त्यानंतर मात्र राज्यात रुग्णांचा आलेख वाढतच गेला. मुख्यमंत्र्यांनी आधीच लोकांना खबरदारी घेण्यास सांगितली आहे, अन्यथा लॉकडाऊनला सामोरे जावं लागेल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.