चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

0
19

चारा घोटाळा प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या जामीन अर्जावर झारखंड उच्च न्यायालय शुक्रवारी सुनावणी घेणार आहे. लालू प्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री असताना चारा घोटाळ्याच्या प्रकरणात चाईबासा कोषागारातून 33.67 कोटी रुपयांची रक्कम काढून घेण्यात आली होती. डिसेंबर 2017 पासून तुरूंगात असलेल्या यादव यांना या प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत 2018 मध्ये सात वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. चारा घोटाळ्याप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी झारखंड उच्च न्यायालयाने शुक्रवारी 19 फेब्रुवारीला तहकूब केली.