महाड दुर्घटनेत बचावलेल्या दोन निराधार मुलांना प्रत्येकी दहा लाखांची मदत

0
31

महाड तालुक्यातील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली होती, या दुर्घटनेत 4 वर्षीय मोहम्मद बांगी आणि अहमद शेखनाग ही दोन लहान मुले सुदैवाने बचावली होती. मात्र दुर्घटनेत पालक गमावल्याने ही मुलं पोरकी झाली होती. त्यांना आधार मिळावा याच दृष्टीने या दोन मुलांचे पालकत्व डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन ने स्विकारले असून आज महाड येथे जाऊन या दोन्ही मुलांची भेट घेतली. प्रत्येकी १० लाख रुपयांचे धनादेश त्यांच्या हाती सुपुर्द केले असून त्यांच्या नावे बँक खाती उघडून फिक्स्ड डिपॉझिटमध्ये सदर रक्कम ठेवण्यात येणार आहे. तसेच या दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च देखील डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन उचलणार आहे.