धावपटू हिमा दास आता आसामची डीएसपी

0
50

भारताची स्टार धावपटू हिमा दास हिचे बालपणीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. हिमाची आसाम पोलिसात उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी हिमाला नियुक्तीपत्र बहाल केले. यावेळी पोलिस महासंचालकांसह उच्च पोलिस अधिकारी आणि राज्य सरकारचे अधिकारीही उपस्थित होते. उपअधीक्षकपदाची जबाबदारी सांभाळताना आपलं अॅथलेटिक्स करिअरवरही लक्ष ठेवणार असल्याचे तिने यावेळी सांगितले.

हिमा दास हिचा जन्म आसाममधील नागौन जिल्ह्यातील धींग गाव येथे 9 जानेवारी 2000 साली झाला आहे. संपूर्ण कुटुंब भात शेतीवर अवलंबून आहे. हिमाने कित्येक वर्षे शेतात राबली आहे. अॅथलेटिक्ससाठी गुवाहटी येथे जाऊन प्रशिक्षणासाठी कुटुंबांनी केवळ तिला तीन वेळेचं जेवण मिळेल यासाठी परवानगी दिली होती.