हॉलिवूड गायिका लिली सिंगचा भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

0
43

गेल्या काही काळात शेतकरी आंदोलनाची चर्चा कमी प्रमाणात ऐकू येते. पण २६ जानेवारीला झालेल्या प्रकारानंतर या आंदोलनला पुन्हा नवीन वळण लागलं आहे.

हॉलिवूड गायिका लिली सिंगने ग्रॅमी रेड कार्पेट सोहळ्यात ‘स्टँड विथ फार्मर्स’ हा मास्क परिधान करुन भारतातील शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला. या आंदोलनाचे पडसाद जगप्रसिद्ध ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यातही पाहायला मिळाले. या मास्कच्या माध्यमातून तिनं भारतातील शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.