“देशमुखांनी राजीनामा दिलाचं पाहिजे, तोपर्यंत भाजपा शांत बसणार नाही” – चंद्रकांत पाटील

0
49

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अगोदर सल्ला दिला होता कि, गृहमंत्रीपद हे राष्ट्रवादी कांग्रेसला देऊ नका, नाही तर मातोश्रीवर देखील कॅमेरे लागतील. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपानंतर भाजपा अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांचा हा वीडियो सोशल मीडिया व्हायरल झाला होता. पाटलांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले होते कि, गृहमंत्रीपद त्यांनी स्वतः हा ठेवावे. जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझे ऐकले असते तर आज त्यांच्यावर हा दिवस आला नसता.

परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर राजकारणात खळबळ माजली आहे. त्यामुळे आज सकाळपासून पुण्यात भाजपाने आंदोलन केले आहे. “अनिल देशमुखांची कसून चौकशी करा, तसेच त्यांच्याकडून राजीनामा घ्या”, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच जोपर्यंत अनिल देशमुख राजीनामा देणार नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असं देखील चंद्रकांत पाटील यांनी सांगितल आहे.

तसेच पाटील म्हणाले कि, मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो, राष्ट्रवादी तुम्हाला संपवायला निघाले आहेत. कारण जेव्हा पुजा चव्हाणचे प्रकरण होते, तेव्हा संजय राठोडचा राजीनामा घेतला, मात्र एका वेगळ्या चर्चेत आलेल्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला नाही? तसेच आताच्या प्रकरणात वाझेंना निलंबित केले परंतु आता अनिल देशमुखांना वाचवले जात आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी राष्ट्रवादी तुम्हालाच धारेवर धरत आहे, म्हणून शरद पवार आणि त्यांची राष्ट्रवादी तुम्हाला संपवणार असे, त्यांनी सांगितले आहे.