गृहमंत्र्यांची विधानपरिषदेत घोषणा, सचिन वाझे यांची तात्काळ बदली

0
39

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून सध्या चांगलाच गोंधळ सुरु आहे. या प्रकरणावरून अधिवेशनात भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती, तसेच पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या निलंबनाची मागणी देखील अधिवेशनात करण्यात आली होती. याचा विचार करत राज्य सरकारने एक पाऊल टाकले आहे. सचिन वाझे यांची क्राईम ब्रांच युनिटमधून बदली केली जाईल, अशी तात्काळ घोषणा गृहमंत्र्यांनी केली आहे.

तरीही सुद्धा सचिन वाझे यांना निलंबित करावे आणि अटक करण्यात यावी अशी मागणी भाजप आमदारांनी लावून धरली आहे.