पुनर्वसन सदनिका संगणकीय प्रणालीद्वारे निश्चितीचा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते शुभारंभ

0
38

म्हाडा संक्रमण गाळ्यात स्थलांतरित झालेल्या 272 पात्र भाडेकरूंना वितरित करावयाच्या पुनर्वसन सदनिका संगणकीय प्रणालीद्वारे निश्चितीचा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते शुभारंभ झाला. “देशातील सर्वात मोठा नागरी पुनरुत्थान प्रकल्प खऱ्या अर्थाने मार्गी. ना.म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींतील पात्र रहिवाशांना पुनर्वसन होऊ घातलेल्या इमारतींत मिळाली सदनिका. यामुळे बीडीडी पुनर्वसन प्रकल्पाबाबत सर्वांचाच विश्वास अधिक दृढ होणार” अशी प्रतिक्रिया गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. यावेळी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.