खासगी रुग्णालयात कोरोना लसीची किंमत किती ?

0
36

देशात केंद्र सरकारने लसीकरणाला जानेवारीपासून सुरवात केली आहे. यामध्ये पहिला टप्प्यात कोरोना विरुद्धच्या लढाईत फ्रंट लाईन काम करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, सैनिक यांना लस देण्यात आली. आता 1 मार्चपासून कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. यामध्ये जेष्ठ नागरिकांना लस देण्यात येणार आहे. कोरोना लसीकरणाला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारने 10 हजार खासगी रुग्णालयांची सुद्धा निवड केली आहे. केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजनेत महाराष्ट्रातील 659 तर केंद्र सरकार आरोग्य योजनेअंतर्गत 116 खासगी रुग्णालयांना कोरोना लसीकरणासाठी परवानगी दिली आहे.
कोरोना लसीकरण मोहिमेत आता खासगी रुग्णालये कोरोना लसीकरण केंद्र म्हणून काम करणार आहेत. या रुग्णालयात प्रत्येक व्यक्तीला 250 रुपये खर्च येणार आहे. मात्र यातील 150 रुपये रुग्णालयांना शासनाकडे भरावे लागणार आहेत. पंतप्रधान आयुष्मान भारत जनआरोग्य योजना, महात्मा फुले आरोग्य योजना अशा शासकीय योजनांचे लाभ देणाऱ्या रुग्णालयांमध्येच ही लस उपलब्ध होणार आहे.