पतंजलीचा कोरोनिलवरील दावा कितपत खरा? आयएमएने आरोग्यमंत्र्यांना मागितले स्पष्टीकरण

0
36

बाबा रामदेवची कंपनी पतंजलीच्या कोरोनिल टॅबलेटला जागतिक आरोग्य संघटनेकडून प्रमाणपत्र मिळाल्याचा दाव्याला इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) खोटं असल्याचे सांगत आश्चर्य व्यक्त केले. तसेच केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्याकडे स्पष्टीकरण सुद्धा मागितले आहे.
पतंजलीने दावा केलाय की कोरोनिल औषध कोविड -19 ला बरे करू शकते आणि पुराव्यांच्या आधारे याची पुष्टी केली गेली आहे.मात्र डब्ल्यूएचओने याबाबद स्पष्टीकरण दिले असून कोविड -19 च्या उपचारासाठी कोणत्याही पारंपारिक औषधाला प्रमाणपत्र दिले नसल्याचे सांगितले आहे.
आयएमए म्हणाले, ‘देशाला आरोग्य मंत्र्यांकडून स्पष्टीकरण हवे आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन नॅशनल मेडिकल कमिशनलाही स्वत: संज्ञान घेण्याबाबत पत्र देण्यात येईल. हे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमांचे उल्लंघन असून डब्ल्यूएचओकडून प्रमाणपत्राचा पूर्ण खोटापणा पाहून इंडियन मेडिकल असोसिएशनला धक्का बसला आहे.’