कंगना ईमेल प्रकरणी हृतिक रोशनला पोलिसांचा समन्स

0
20

अभिनेता हृतिक रोशन याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने समन्स पाठवला आहे. अभिनेत्री कंगना रणौतने दाखल केलेल्या तक्रारीसंदर्भात त्याची चौकशी केली जाणार आहे. कंगनाने हृतिकवर ईमेल्सच्या माध्यमातून संवाद झाल्याचे गंभीर आरोप केले आहेत. याच आरोपाप्रकरणी हृतिकची चौकशी केली जाणार आहे. हृतिक आणि कंगना यांच्यात क्रिश सिनेमाच्या चित्रीकरणावेळी प्रेमसंबंध जुळले होते. मात्र त्यानंतर ब्रेकअप झाल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर दोघांमध्ये आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. आता पहिल्यांदाच पोलिसांनी हृतिक रोशनला या प्रकरणी चौकशीसाठी बोलावले आहे.