कंगना ई-मेल प्रकरण: हृतिक रोशन गुन्हे शाखेत जबाब नोंदीसाठी पोहोचला

0
34

अभिनेता हृतिक रोशन मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत जबाब नोंदवण्यासाठी पोहोचला आहे. अभिनेत्री कंगना रणौतने दाखल केलेल्या तक्रारीसंदर्भात त्याची चौकशी केली जात आहे. कंगनाने हृतिकवर ईमेल्सच्या माध्यमातून संवाद झाल्याचे गंभीर आरोप केले आहेत. याच आरोपाप्रकरणी हृतिकची चौकशी सुरु आहे. हृतिक आणि कंगना यांच्यात क्रिश सिनेमाच्या चित्रीकरणावेळी प्रेमसंबंध जुळले होते. मात्र त्यानंतर ब्रेकअप झाल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर दोघांमध्ये आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. आता पहिल्यांदाच पोलिसांनी हृतिक रोशनला या प्रकरणी चौकशीसाठी बोलावले आहे.