बिडेन यांचे 5 दूरचे नातेवाईक मुंबईत राहतात?

0
23
  • जो बिडेन यांचे 5 नातेवाईक हे मुंबईत राहतात, असं खुद्द बिडेन यांनी सांगितलं होतं
  • 2013मध्ये जो बिडेन जेव्हा भारतात आले होते तेव्हा त्यांनी मुंबईतील आपल्या दूरच्या नातेवाईकांबद्दल सांगितलं होतं
  • तसेच त्याच्या 2 वर्षानंतर वॉशिंग्टनमध्ये पुन्हा आपले नातेवाईक मुंबईत राहत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला होता
  • काही दशकांनंतर त्यांना मुंबईहून बिडेनच्या आडनाव नावाचे पत्र आले होते
  • 24 जुलै 2013 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजला संबोधित करतांना बिडेन यांनी त्या पत्राचा उल्लेख करत आपल्या मुंबईतील नातेवाईकांबद्दल सांगितलं होतं
  • सिनेटचा सदस्य झाल्यानंतर, बिडेन यांना समजले की त्यांचे “पणजोबाच्या पणजोबाचे पणजोबांनी” ईस्ट इंडिया कंपनीत काम केले होते
  • बिडेन यांच्या वक्तव्यानंतर अद्यापपर्यंत मुंबईतील एकाही व्यक्तीने बिडेन यांचा नातेवाईक असल्याचा दावा केलेला नाही