NEET, JEE च्या परीक्षांवरून वादंग

0
6

कोरोनामुळे भीषण परिस्थिति उद्भवली असून NEET आणि JEE च्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोरात

परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी नेतेही आग्रही

“NEET आणि JEE 2020च्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार”

शिक्षण मंत्रालयाचं स्पष्टीकरण


JEE आणि NEET परिक्षेसंदर्भातील मोठ्या घडामोडी
◆ नवी दिल्ली : NEET, JEE मुख्य परीक्षा 2020 पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी सुमारे 4,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी दिवसभर उपोषण केले

◆ आखाती देशांमधील परीक्षा केंद्रांवर NEET (UG) 2020 घेण्याचे केंद्राला दिलेले निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नाकारले. 

सर्वोच्च न्यायालयाने मात्र सरकारला ‘वंदे भारत मिशन’ फ्लाइटमार्फत विद्यार्थ्यांना परीक्षेस येण्याची परवानगी देण्यास सांगितले

◆ कोविड-19चा प्रसार नियंत्रणात येईपर्यंत स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्याचे द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टालिन यांचं केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांना आवाहन

◆ '“एकतर्फी आणि नोकरशाही निर्णय” घेऊन विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात आणू नये'
ममता बॅनर्जींची मोदी सरकारवर टीका

◆ "प्रवेश परीक्षेसह सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी देशभरातील शारिरीक किंवा ऑनलाईन परीक्षा कृपया पुढे ढकलाव्या"
आदित्य ठाकरेंचं नरेंद्र मोदींना पत्र

◆सरकारने विद्यार्थ्यांची 'मन की बात' ऐकली पाहिजे आणि “एक योग्य तोडगा काढायला पाहिजे” - राहुल गांधी

◆
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्यासह शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी NEET, JEE सह इतर स्पर्धा परीक्षा दिवाळीनंतर घेण्याचे सुब्रमण्यम स्वामी यांचे आवाहन
 

Leave a Reply