AstraZeneca-ऑक्सफर्ड कोरोना लसीला मोठा झटका, दक्षिण आफ्रिकेने थांबवला वापर

0
33

दक्षिण आफ्रिकेने ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका या कोरोना लसीचा वापर थांबवित असल्याचे जाहीर केले.दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्यमंत्री म्हणाले ‘एका नवीन अभ्यासानुसार दक्षिण आफ्रिकेच्या कोरोना विषाणूच्या स्टेनवर ही लस कमी प्रभावी असल्याचे दिसून आल्यानंतर ऑक्सफोर्डच्या लसीचा वापर थांबविण्यात आला आहे.’ यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या दोन विषाणू तज्ञांनी सरकारला इशारा दिला होता की ऑक्सफोर्डच्या कोरोना लसीवर बंदी घालणे आवश्यक आहे. ही लस लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात भारतात वापरली जात आहे.

  • दक्षिण आफ्रिकेने ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका कोरोना लसीचा थांबविला वापर
  • दक्षिण आफ्रिकेच्या कोरोना विषाणूच्या स्टेनवर ही लस कमी प्रभावी असल्याचे म्हणणे
  • ही लस लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात भारतात वापरली जाते