पुण्यात महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे घराला भीषण आग

0
29

पुण्यातील जुन्नर तालुक्यातील सीतेवाडी येथील एका घराला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. सकाळी १०च्या सुमारास ही आग लागली असून महावितरणाच्या गलथान कामामुळे अधिक विद्युत दाब आल्याने घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले असे म्हटले जातेय.दरम्यान, घटनास्थळी तातडीने बिडिओ हेमंत गरीबे, ग्रामसेवक गणेश थोरात, आमदार शरद सोनवने, देवराम लांडे यांनी या कुटुंबाला तातडीची ५० हजार रुपयांची मदत घर दुरुस्तीसाठी देऊ, असे आश्वासन बिडिओ गरीबे यांनी दिली.

  • पुण्यात एका घराला भीषण आग
  • महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे आग लागल्याचा आरोप
  • कुटुंबाला तातडीची ५० हजार रुपयांची मदत
  • घर दुरुस्त करून देण्याचे आश्वासन