देशात गेल्या 24 तासांत 53,476 नव्या रुग्णांची नोंद

0
33

राज्यासहित देशभरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत  चालली आहे. गेल्या 24 तासांत देशात 53,476 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 251 जणांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशाची एकूण रुग्णसंख्या आता 1,17,87,534 वर पोहोचली आहे. काल दिवसभरात 26,490 जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत 1,12,31,650 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.