पुजा चव्हाण प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर जोर धरून आहे. यामध्ये प्रामुख्याने नाव येणारे संजय राठोड हे नॉट रिचेबल होते. आता ते यवतमाळ येथील घरी दाखल झाले आहेत. गेल्या 15 दिवसांपासून ते माध्यमांसमोर आले नव्हते.ते यवतमाळ येथून वाशिममधल्या पोहरादेवीसाठी रवाना झाले. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी अडचणीत सापडलेले संजय राठोड आज मौन सोडले आहे
वनमंत्री संजय राठोड यांच्या यवतमाळ दौऱ्याचा कार्यक्रम स्थानिक प्रशासनाला प्राप्त झालाय. समर्थकांनी राठोडांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु केली आहे.मूळची बीडमधल्या परळीची असलेल्या पूजा चव्हाणचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला आहे.
लाईव्ह अपडेट…
पूजा चव्हाणच्या मृत्यूबाबत जे घाणेरडे राजकारण केले जातंय मी त्याचा निषेध करतो- संजय राठोड
माझं आयुष्य उद्ध्वस्थ करण्याचा प्रयत्न केला- संजय राठोड