महाराष्ट्रात कोरोनाचा पसराव कमी होत चालला आहे. राज्यात आज 3670 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच यामध्ये आज नवीन 2422 कोरोना बाधित रुग्ण बरे सुद्धा झाले आहेत. यामध्ये आजपर्यत एकूण 1972475 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. सध्या राज्यात एकूण 31474 ऍक्टिव्ह रुग्ण असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.91% झाले आहे.अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.