ऋषीगंंगा नदीपात्रात वाढ; बचावकार्य थांबवले

0
31

उत्तराखंड : ऋषीगंगा नदीपात्रात वाढ होत असल्याने चमोली जिल्ह्यातील बचावकार्य थांबवण्यात आलं आहे. एसडीआरएफने दिलेल्या माहितीनुसार, तपोवन बोगद्याजवळ पाणी पोहोचल्यामुळे बचावकार्य थांबवले आहे. जेसीबी मशीन आणि इतर उपकरणांनाही तेथून हटवण्यात आलं आहे. सोबतच रैणी गावातही अलर्ट जारी करण्यात आला आहे. ऋषीगंगा नदीपात्रात वाढ झाल्याने आसपासच्या गावांना खाली करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.