Ind vs Eng 1st ODI Match : भारताची शानदार सुरवात, इंग्लंडवर ६६ रणांनी मात 

0
30

आजच्या ओडीआय च्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने प्रसिद्ध कृष्णाच्या 4 विकेट आणि शार्दुल ठाकूरच्या 3 विकेटच्या जोरावर इंग्लंडला 66 धावांनी हरवले. प्रसिद्ध ने त्याच्या डेब्यु मॅच मधेच कमाल करून दाखवला. याखेरीज क्रुणाल पांड्याला एक तर भुवनेश्वर कुमारला दोन यश मिळाले. बॅटिंग करताना भारताने इंग्लंडला विजयासाठी 318 धावांचे लक्ष्य दिले, प्रत्युत्तरात इंग्लंड 42.1 षटकांत 251 धावांवर कमी झाला. इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टोने सर्वाधिक 94 आणि जेसन रॉयने 46 धावा केल्या. या दोघांमध्ये 135 धावांची भागीदारी झाली.तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाला 1-0 अशी आघाडी मिळाली आहे.यामध्ये धवन शतक बनवण्यापासून थोड्याने चुकले मात्र विराट कोहली, क्रुणाल पांड्या आणि राहुलने तडाखेबाज अर्धशतक बनवले.