पहिल्या दिवसअखेर भारताच्या 3 बाद 99 धावा

0
45

तिसऱ्या कसोटी सामन्यावर भारताची मजबूत पकड दिसून आली. पहिल्या दिवसात इंग्लंडचा संपूर्ण संघ 112 या धावसंख्येवर तंबूत परतला. भारताकडून फिरकीपटू अक्षर पटेलने दमदार गोलंदाजी करत 6 गडी बाद केले. तर आर. अश्विनने 3 आणि इशांत शर्माने 1 गडी बाद केला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघालाही सुरुवातीला दोन झटके बसले. चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल स्वस्तात बाद झाले. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी भारताचा डाव सावरला. मात्र लिचच्या गोलंदाजीवर विराट कोहली बाद झाला. शेवटच्या दिवसाच्या खेळ संपला तेव्हा रोहित शर्मा 57 तर अजिंक्य रहाणे 1 या धावसंख्येवर खेळत होता. भारताला या कसोटीत मोठी धावसंख्या उभारण्याची संधी आहे. मात्र भारतीय फलंदाज दुसऱ्या दिवशी कशी फटकेबाजी करतात याकडे लक्ष लागून आहे.