सोमवारी देशात इतक्या कोरोना रुग्णांची नोंद

0
35

देशात लसीकरण मोहिमेचा दूसरा टप्पा सुरु आहे. तर दूसरीकडे कोरोनाची साखळी अजूनही तुटत नसल्याचे समोर आले आहे. सोमवारी 12,286 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून देशातील आतापर्यंत कोरोनाची लागण झाल्याचा एकूण आकडा 1 कोटी 11 लाख 24 हजार 527 वर पोहोचला आहे. तर एका दिवसात 12 हजार 464 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनातून 1 कोटी 7 लाख 98 हजार 921 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सोमवारी 91 रुग्ण कोरोनामुळे दगावल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कोरोनामुळे एकूण 1 लाख 57 हजार 248 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 1 लाख 68 हजार 358 कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनाचा फेैलाव रोखण्यासाठी आतापर्यंत 1 कोटी 48 लाख 54 हजार 136 जणांचं लसीकरण करण्यात आले आहे.