गर्दी करु नका, मास्क वापरा आणि कोरोना टाळा

0
57

देशात मंगळवारी 13,742 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 14,037 रुग्णांनी कोरोना मात केल्याने त्यांनी डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनाने 104 जणांचा जीव घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. सध्या देशात 1 लाख 46 हजार 907 अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण 1 कोटी 10 लाख 30 हजार 176 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 7 लाख 26 हजार 702 जणांनी कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. कोरोनामुळे एकूण 1 लाख 56 हजार 567 जणांचा मृत्यू झाला आहे. दूसरीकडे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी 1 कोटी 21 लाख 65 हजार 598 जणांचे लसीकरण झाले आहे. असं असलं तरी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.