देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार

0
33

देशात मागच्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या तुलनेत आज कोरोना रुग्णांच्या संख्येत कमी आल्याचे चित्र आहे. देशात मागच्या 24 तासात 16,838 नव्या रुग्णांची नोंद झाली असून एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1.11कोटींवर पोहोचला आहे. तर मागच्या 24 तासात 113 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 1 लाख 57 हजार 548 जणांचा मृत्यू झाला आहे. दूसरीकडे रुग्ण संख्येत चढ-उतार होत असताना रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही सर्वाधिक आहे. गेल्या 24 तासात 13,819 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे 1 कोटी 8लाख 39 हजार 894 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार दिसत आहे. अंधेरीतील एका रेस्टॉरंटमधील 10 जणांना कोरोनाची बांधी झाली आहे. त्यानंतर महापालिका प्रशासन तातडीच्या उपाययोजना करत आहे.
कोरोना रोखण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम सुरु आहे. खासगी रुग्णालयानाही लसीकरणासाठी अटी शर्थींसह मंजुरी देण्यात आली आहे,