देशात मंगळवारी 14,989 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

0
31

देशात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लसीकरण मोहिम जोरदार सुरु आहे. तर दूसरीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंतेत भर पडत आहे. मंगळवारी देशात 14 हजार 989 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 13 हजार 123 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यानं त्यांना घरी सोडण्यात आली आहे. तर कोरोनामुळे 98 जणांना जीव गमवावा लागला आहे.
देशात आतापर्यंत एकूण 1 कोटी 11 लाख 39 हजार 516 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 8 लाख 12 हजार 44 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकूण 1 लाख 57 हजार 346 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सध्या 1 लाख 70 हजार 126 अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी 1 कोटी 56 लाख 20 हजार 749 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.