चिंतेत भर! एका दिवसात 16,577 कोरोना रुग्णांची नोंद

0
33

लॉकडाऊन शिथीलीकरण आणि नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. गुरूवारी 16,577 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होत असल्याचे चित्र आहे. एका दिवसात 12,179 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 120 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचने याबाबतची माहिती दिली आहे. आतापर्यंत देशात एकूण 1 कोटी 10 लाख 63 हजार 491 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 1 कोटी 7 लाख 50 हजार 680 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 1 लाख 56 हजार 825 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 1 लाख 55 हजार 986 कोरोना रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर देशातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आतापर्यंत 1 कोटी 34 लाख 72 हजार 643 रुग्णांचे लसीकरण झाले आहे.