चेन्नईत भारताची ‘कसोटी’ पणाला

0
37
SOURCE- BCCI TWITTER HANDLE
SOURCE- BCCI TWITTER HANDLE

इंग्लंडने पहिल्या डावात 578 धावांचा डोंगर रचल्यानंतर भारताची कसोटी पणाला लागली आहे. या धावांचा पाठलाग करताना भारताचे 4 गडी झटपट बाद झाले. रोहित शर्मा (6), विराट कोहली (11), अजिंक्य रहाणे (1) तर शुभनन गिल (29) धावा करुन तंबूत परतले. त्यामुळे फॉलोन आणि सामना वाचवण्यासाठी तळाच्या फलंदाजांचा कस लागणार आहे. चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांनी डाव सावरला आहे.

शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पुजाराने नाबाद 72 तर ऋषभ पंतने नाबाद 70 धावा केल्या आहेत. तर भारताचे धावसंख्या 4 बाद 189 इतकी झाली आहे. तर भारत अजूनही 388 धावांनी पिछाडीवर आहे.