आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारताला सूर गवसताना दिसत नाही. होम पिचवर इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांची त्रेधातिरपिट उडवून दिली. पहिली कसोटी गमावल्यानंतर साहेबांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यात दुसऱ्या कसोटीतील पहिला डाव 329 धावांवर आटोपला. रोहीत शर्मा आणि अजिंक्य रहाणे व्यतिरिक्त एकही फलंदाज चांगली कामगिरी करु शकलेला नाही.