देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ

0
33

देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढले आहे. लसीकरण मोहिमेनंतर काही प्रमाणात रुग्ण कमी झाले होते. मात्र त्यानंतर लॉकडाऊन शिथील केल्यानंतर आणि नागरिकांचा हलगर्जीपणा यामुळे पुन्हा एकदा कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. गेल्या 24 तासात देशात 13,993 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 101 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. कोरोनामुळे आतापर्यंत 1 कोटी 9 लाख 77 हजार 387 जणांना लागण झाली आहे. त्यापैकी एकूण 1 लाख 56 हजार 212 जणांचा मृत्यू झाला आहे.