SAARC देशांच्या कोरोनाबाबतच्या बैठकीसाठी भारताने केलं पाकिस्तानला निमंत्रित

0
23

जगात पुन्हा कोरोनाचा प्रसार वेगाने होण्यास सुरुवात होत आहे. भारतातही कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानला SAARC देशांच्या आभासी मीटिंगमध्ये सामील होण्यास निमंत्रित केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण असणार आहे. या बैठकीत कोरोनाबाबतच्या उपाययोजनांबाबत निर्णय घेण्यात येतील. सार्क देशांच्या आरोग्य सचिव-स्तरीय बैठकीत काय निर्णय घेण्यात येणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.