70 लाखाहून अधिक लोंकाना लस देणारा भारत जगातील सर्वात वेगवान देश

0
31

कोरोनाला रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहीम वेगात सुरु आहे. सध्या 70 लाखाहून अधिक लोंकाना लस देणारा भारत जगातील सर्वात वेगवान देश बनला आहे. केवळ 26 दिवसांत भारताने हा टप्पा पूर्ण केला आहे. गेल्या 24 तासांत 17 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. गेल्या 24 तासांत देशात 1,42,562 सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. तर देशाचा एकूण रिकव्हरी रेट हा 97.26 टक्क्यांवर गेला आहे. भारताचा हा रिकव्हरी रेट जागतिक स्तरावरील सर्वोच्च रेटपैकी एक आहे