पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड मजबूत स्थितीत असून तिसऱ्या दिवशीही भारतावर दबाव कायम आहे. पहिल्या डावात केलेल्या 578 धावांचा पाठलाग करताना निम्मा संघ तंबूत परतला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 6 गडी गमवून 257 धावा केल्या होत्या. वॉशिंग्टन सुंदर आणि आर अश्विन मैदानात आहेत. सुंदरने 31 तर अश्विनने 8 धावा केल्या आहेत. त्यामुळे या जोडीवरच भारताची मदार असणार आहे. अपेक्षित धावसंख्या उभारल्या नाहीतर भारताला फॉलोऑनला सामोरे जावे लागेल. भारताला फॉलोऑन टाळण्यासाठी 378 धावा करणे आवश्यक आहे. भारताच्या हातात 4 गडी असून अजून 121 धावा करणे गरजेचे आहे. तर इंग्लंडकडे अद्यापही 321 धावांची आघाडी आहे.