भारताकडून जगाला 229.7 लाख लसींचा पुरवठा

0
39

भारताने मैत्री करारानुसार 12 फेब्रुवारी 2021 पर्यंत 229.7 लाख कोरोना लसीचे डोस इतर देशांना पुरवले आहेत. त्यापैकी 64.7 लसीचे डोस अनुदानांतर्गत दिल्या गेल्या आहेत. तर 165 लाख डोस हे व्यावसायिक स्वरुपात पुरवण्यात आले आहेत.

मैत्री करारानुसार आतापर्यंत बांगलादेशला 20 लाख, म्यानमारला 17 लाख, नेपाळला 10 लाख, भुटानला 1.5 लाख, मालदीवला 1 लाख, मॉरिशिअसला 1 लाख, आफगाणिस्तानला 5 लाख, श्रीलंकेला 5 लाख, बारबाडोसला 1 लाख, बर्हेनला 1 लाख, ओमनला 1 लाख, डॉमनिकाला 70 हजार तर सिचेलससला 50 हजार लसीचे डोस पुरवले आहेत.

दुसरीकडे व्यावसियदृष्ट्या ब्राझीलला 20 लाख, मोरोक्कोला 60 लाख, दक्षिण आफ्रिकेला 10 लाख, बांगलादेशला 50 लाख, म्यानमारला 20 लाख, कुवैतला 2 लाख, युएईला 2 लाख, इजिप्तला 50 हजार तर अलजेरियाला 50 हजार लसीचे डोस पुरवले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे.