DAY1: भारताच्या 6 गडी बाद 300 धावा

0
171
SOURCE- BCCI TWITTER HANDLE
SOURCE- BCCI TWITTER HANDLE

दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र सकाळच्या तीन गडी झटपट बाद झाल्याने मोठी धावसंख्या उभी राहील की नाही असा प्रश्न क्रिकेट रसिकांच्या मनात होता. मात्र रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या दोघांनी भारताचा डाव सावरला. रोहित शर्माने 161 तर अजिंक्य रहाणे 67 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 6 गडी गमवून 300 केल्या होत्या. ऋषभ पंत आणि अक्षर पटेल सध्या मैदानात तग धरून आहेत. कर्णधार विराट कोहली आणि शुभमन गिल पहिल्या डावात भोपळाही फोडू शकले नाहीत. इंग्लंडकडून अली आणि लीचने प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर स्टोन आणि रुटने प्रत्येकी एक गडी बाद केला

आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि कसोटीत वर्चस्व प्रस्थापित करायचे असेल दुसऱ्या दिवशी तळाच्या फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल. तसेच गोलंदाजीत कमाल दाखवावी लागेल.