इंग्लंडने भारतीय गोलंदाजांची दाणादाण उडवून कसोटीच्या दुसऱ्या दिवशी धावांचा डोंगर रचला. इंग्लंडने 8 गडी गमवत 555 धावा केल्या. जो रुट आणि बेन स्टोक्सने दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात 92 धावा केल्या. बेन स्टोक्स आणि रुट या जोडीने चौथ्या विकेटसाटी 221 चेंडुत 124 धावांची खेली केली. तर100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या रूटनं चेन्नईत 218 धावांची खेळी करत विश्वविक्रम नोंदवला. भारताकडून इशांत शर्मा, बुमराह, आर. अश्विन, शाहबाज नदीम यांनी प्रत्यकी दोन गडी बाद केले.
इंग्लंडने अजूनही डाव घोषित केला नाही. तिसऱ्या दिवशीच्या सुरुवातीला डाव घोषित करून भारताला फलंदाजीचे आव्हान देतील अशी शक्यता आहे. आता भारतीय फलंदाजांसमोर मोठी धावसंख्या उभारण्याचे आव्हान असणार आहे. या कसोटी मालिकेवर भारताचे आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपचे तिकीट अवलंबून आहे.