भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना

0
40

इंग्लंड विरुद्ध भारत तिसरा कसोटी सामना आज मोटेरा येथे खेळला जाणार आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघाची 1-1ने बरोबरी आहे. आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी हा दोन्ही संघासाठी अंत्यत महत्त्वाचा आहे. भारताला कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी मालिका 2-1 ने जिंकावा लागेल. तर इंग्लंडला 3-1ने मालिका जिंकावी लागेल आज (बुधवारी) दुपारी 2.30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. पिंक चेंडुने हा डे नाईट कसोटी सामना खेळला जाणार आहे.

मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात भारत ऑस्ट्रेलिया विरुद्ध एडिलेडवर पहिला पिंक बॉल कसोटी सामना खेळला होता. या सामन्यात भारतीय संघाचा दूसरा डाव अवघ्या 36 धावांवर आटोपला होता.

भारताचा जलदगती गोलंदाज इशांत शर्मा आज 100 कसोटी सामना खेळणार आहे.