भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय, मालिकेत 1-1 ने बरोबरी

0
29
SOURCE- BCCI TWITTER HANDLE
SOURCE- BCCI TWITTER HANDLE

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला आहे. 317 धावांनी भारताने इंग्लंडला नमवले आहे. या विजयासह मालिकेत 1-1 ने बरोबरी झाली आहे. आर. अश्विनची शतकी खेळी आणि गोलंदाजीच्या जीवावर भारताने हा सामना जिंकला. तर अक्षर पटेलनंही दूसऱ्या डावात फिरकीची जादू दाखवत 5 गडी बाद केले. दूसरीकडे इंग्लंडने सामना गमवल्यामुळे आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जाण्यासाठी पुढील दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. तर भारताला दोन्ही सामने जिंकावे लागतील किंवा एक सामना ड्रा करुन एक जिंकावा लागणार आहे.