तिसरा कसोटी सामना भारताच्या खिशात, मालिकेत 2-1 ने आघाडी

0
40

चार कसोटी सामन्याच्या मालिकेत भारताने तिसरा कसोटी सामना जिंकत 2-1 ने आघाडी घेतली आहे. भारताच्या विजयामुळे इंग्लंडचं आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जाण्याचे स्वप्न भंगले आहे. दुसऱ्या डावातही इंग्लंडचा संघ अवघ्या 81 धावा करु शकला आणि भारताला 49 धावांचं आव्हान दिले. भारताने एकही गडी न गमवता हे आव्हान सहज पूर्ण केले. पाच दिवसीय कसोटी सामना अवघ्या दोन दिवसात संपला. अक्षर पटेलने दूसऱ्या डावात 5 गडी बाद करत एका सामन्यात एकूण 11 गडी बाद केलेत. तर अश्विन आणि वाशिंग्टनने प्रत्येकी 4 आणि 1 गडी बाद केला.
आता चौथ्या कसोटी सामन्यावर ऑस्ट्रेलियाचे आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपचं गणित अवलंबून असणार आहे. इंग्लंडने चौथा कसोटी सामना जिंकावा यासाठी ऑस्ट्रेलिया देव पाण्यात बुडवून बसला आहे. कारण चौथा कसोटी सामना ड्रा झाला किंवा भारताने जिंकला तर ऑस्ट्रेलियाचे अंतिम फेरीत जाण्याचे स्वप्न भंगणार आहे. यापूर्वी न्यूझीलंडने अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे.