राज्यसरकारचा अंदाधूंद कारभार अजूनही सुरुच : प्रवीण दरेकर

0
39


मुंबई – राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज राज्यसरकारवर घणाघाती टीका केली. कायदा सुव्यवस्थेचे गेल्या दीड वर्षापासून हाल होत आहे, असे दरेकर यांनी स्पष्ट केले. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण व गणेश नायडू यांनी खादी ग्रामोद्योग शासनाच रेवेन्यू भूखंड हडपला असल्याची तक्रार दरेकर यांनी केली आहे.

राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना दरेकर म्हणाले की, संजय राठोड हे आजही राज्याचे वनमंत्रीच आहेत. कारण जोपर्यंत राज्यपालांकडून त्यांचा राजीनामा मंजूर होत नाही, तोपर्यंत त्यांचं मंत्रीपद कायम आहे असंच म्हणावं लागेल. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत जे सांगितलं की त्यांचा राजीनामा मी काय फ्रेम करुन ठेवणार आहे का, ते आता बघावं लागेल. अधिवेशनादरम्यान हा वेळकाढूपणा तर चालू नाही ना, नाहीतर शेवटच्या दिवशी त्यांचा राजीनामा घेणार नाहीत, असंही होऊ शकतं असा आरोप दरेकर यांनी राज्यसरकारवर केला.

संबंधित लोकप्रतिनिधीचा सहकारी गणेश नायडूने मुंबईतील मोठा सरकारी भूखंड बळकावला आहे. त्याने खादी ग्राम उद्योगचे १५ -१६ एकरची आणि हजारो करोडोचे रुपयाचे शासनाचे रेव्हेन्यूचा भूखंड हडपला आहे. हे लोक अशा प्रकरे जागा हडपणार, पैसे कमवणार आणि नंतर सत्ता पैशाच्या जोरावर इथे स्वैराचार्य करणार असा अंदाधूंद कारभार सुरु आहे. ही प्रवृत्ती थांबवण्यासाठी हा भूखंड ताब्यात घ्यायला पाहिजे. याच भूखंडावर हे लोकं गरबा भरवणार आणि कोट्यावधी रुपये कमावणार हे थांबायला पाहिजे असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

खादी ग्रामोद्योग जागा घेतली तर एकावेळेस मुंबईचे अर्धे प्रश्न सुटतील असे दरेकर यांनी म्हंटले आहे, ऐस. आर. एचे भाडे मिळत नाही, लोक बाहेर आहेत मुंबईचे भाडेकरुचे पैसे सुटून जातील तसेच हे सरकार कोणाला पाठीशी घालत आहे असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सूक्ष्म, लघु, माध्यम उद्योग खाता आहे त्यांना भेटून पैशाची मागणी करणार करून ग्रामोद्योग ज्या प्रकल्प करण्यासाठी आहे तोच प्रकल्प उभे करावे अशी मागणी दरेकर करणार असल्याच सांगितल आहे.
तसेच आमदाराच्या प्रकरणावर बोलताना ते म्हणाले, राज नावाचा मुलगा गेली अनेक वर्षांपासून आपल्या वडिलांच्या शोधात आहे. या मुलाने आणि त्याच्या आईने एका लोकप्रतिनिधीची डीएनए टेस्ट करण्याची मागणी करणारे पेटीशनही दाखल करण्यात आली आहे. न्यायालयात पेटीशन दाखल केले असल्यामुळे मुलाचे नर्सकडून रक्त तपासणी करण्यात आली. यानंतर त्या मुलाला गायब करण्यात आले. मुलगा गायब झाल्याने त्याचा शोध सुरु केला तेव्हा अशी धक्कादायक माहिती समोर आली की मुलाला सुरतला ठेवण्यात आले. नंतर त्याला मारण्याचा प्रयत्न करण्यातही आला असल्याचे त्या मुलाने सांगितले असल्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे