मार्चच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात विक्रमी कोरोना रुग्णांची नोंद

0
37

महाराष्ट्र हे देशातील कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव झालेले राज्य आहे. या वर्षाच्या मार्चच्या पहिल्याच आठवड्यात राज्यातील कोरोनानं पुन्हा एकदा थैमान मांडल आहे. राज्यात आज 9855 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. आज नवीन 6559 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2043349 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 82343 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.77% झाले आहे.

गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या वर्षातील सर्वाधिक 8 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली होती आणि आता मार्चच्या पहिल्याच आठवड्यात विक्रमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या नव्या रुग्णांचा आकडा 9 हजारांच्या पार गेला आहे.अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून नागरिकांना दिली आहे.

राज्यातील 03 मार्चची कोरोना रुग्णांची आकडेवारी

एकूण रुग्ण – 21,79,185

उपचार घेत असलेले रुग्ण – 82,343

दिवसभरातील नवे रुग्ण – 9,855

दिवसभरात बरे झालेले रुग्ण – 6,559

एकूण बरे झालेले रुग्ण – 20,43,349

रुग्ण बरे होण्याचं प्रमाण – 93.77%

दिवसभरातील मृत्यू – 42

मृत्यूचं प्रमाण – 2.40%