गोरेगावमध्ये चोरट्यांची बापलेकीला अमानुष मारहाण

0
45

गोरेगावमध्ये चोरट्यांनी एका बापलेकीला अमानुष मारहाण केली आहे. मोतीलाल नगरमध्ये राहत असलेल्या बापलेकीच्या घरात घुसलेल्या चोरांनी दोघांना बांधून ठेवले. चोरट्यांनी मुलीसोबत गैरवर्तन करत बलात्काराच्या धमक्या दिल्या. जवळपास 9 लाखाचे दागिने आणि 70 हजार रुपयांची रोख रोक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. गोरेगाव पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंदी झाली असून, आरोपी अली भुसावलवाला आणि जोहरा भुसावलवाला यांच्यासोबतच्या इतरांचाही पोलिसांकडून शोध सुरु आहे.