मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची चौकशी एसआयटीकडे, गृहमंत्र्यांची घोषणा

0
35

दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणी चौकशीसाठी एसआयटीची घोषणा करण्यात आली आहे. आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत याबाबद माहिती दिली.यावरून विरोधकांना चांगलेच प्रतिउत्तर देत असल्याचे दिसून आले.

दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली आहे. मोहन डेलकर यांच्या सुसाइड नोटमध्ये भाजप नेत्याचे नाव असल्याचा आरोप काँग्रेस करत आहेत. त्यावरुन डेलकर यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी होत होती. त्यानंतर आज अनिल देशमुख यांनी डेलकर यांच्या मृत्यूप्रकरणी एसआयटी स्थापन करणार असल्याचं म्हटलं आहे.