आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर ३१ मार्चपर्यंत बंदी कायम 

0
37

कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहेत दरम्यान विमानन नियामक नागरी उड्डाण संचलनालयाने  आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घातली होती. ही बंदी ३१ मार्चपर्यंत वाढवण्याचे आता आदेश देण्यात आले आहेत. सोशल मीडियाद्वारे डीजीसीएने यासंबंधी माहिती दिली आहे.

कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी २३ मार्चपासून आंतराष्ट्रीय उड्डाणांवर स्थगिती करण्यात आली आहे. ही बंदी २८ फेब्रुवारीपर्यंत लागू करण्यात आली होती. परंतु पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या आकड्यात होत असलेली वाढ लक्षात घेता ही बंदी ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आलीय.विशेष परिस्थितीत काही निवडक मार्गांवर उड्डाणांची परवानगी दिली जाऊ शकते, असेही डीजीसीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.