आयपीएल लिलावासाठी अंतिम यादी जाहीर, 292 खेळाडूंचा होणार लिलाव

0
76

आयपीएल 2021च्या लिलावासाठी खेळाडूंची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. एकूण 292 खेळाडूंसाठी 18 फेब्रुवारीला बोली लागणार आहे. यात 164 भारतीय, 125 विदेशी आणि असोसिएट देशातील 3 खेळाडूंचा समावेश आहे.

या लिलावात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या मुलगा अर्जुन तेंडुलकर याचाही समावेश आहे. डावखुरा गोलंदाज असलेल्या अर्जुनची बेस प्राईस 20 लाख इतकी आहे.

हरभजन सिंग, ग्लेन मॅक्सवेल, केदार जाधव, स्टिव स्मिथ, मोईन अली, सॅम बिलिंग्स, लियम प्लंकेट, बेसन राॅय, मार्क वुड, कोलिन इनग्राम आणि शाकिब यांची बेस प्राईस 2 कोटी इतकी आहे.