इंडियन प्रिमिअर लीग 2021 साठी खेळाडुंचं चेन्नईत लिलाव सुरु झाला आहे. आयपीएलसाठी आठ टीमसाठी 61 खेळाडुंचा लिलाव सुरु आहे. यात 164 खेळाडुंचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव स्मिथला दिल्ली कॅपिटल्सने 2.20 कोटींना विकत घेतले आहेत. त्याची बेस प्राईस 2 कोटी इतकी होती. तर इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जेसर रॉय, एलेक्स हेल्सला कोणत्याही फ्रेंचाईसीने विकत घेतले नाही. केदार जाधवला कुणीही संघासाठी खरेदी केले नाही.
ग्लेन मॅक्सवेलला आरसीबी फ्रेन्चाईसीने 14.25 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. दक्षिण आफ्रिकेचा क्रिस मॉरिस आयपीएलमध्ये सर्वाधिक बोलीसह राजस्थान रॉयल्सने विकत घेतला. मॉरिसने युवराज सिंगचा विक्रम मोडला आहे. युवराजला यापूर्वी 16 कोटींना विकत घेतले होते.