इस्रोच्या पीएसएलव्ही-सी 51चं काउंटडाऊन सुरु, थोड्याच वेळात प्रक्षेपण

0
39

पीएसलव्ही- सी 51चं श्रीहरीकोटा येथून आज सकाळी 10 वाजून 24 मिनिटांनी प्रक्षेपण होणार आहे. या वर्षातील इस्रोचं हे पहिल मिशन असून पीएसएलव्हीचे हे 53 वं मिशन असून या रॉकेटमधू्न ब्राझीलच्या अमेजॉनिया-1 या उपग्रहासह अन्य 18 उपग्रह अंतराळात पाठवले जाणार आहेत. अॅमेजॉनिया या उपग्रहाद्वारे वनक्षेत्रावर बारीक नजर ठेवली जाणार आहे. ऑमेझॉन वनक्षेत्रातील होणाऱ्या वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी या उपग्रहाचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर कृषी क्षेत्रातील विविध उपाय योजना आणि माहिती पोहोचवण्यासाठी या उपग्रहाचा फायदा होणार आहे.