पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आले आयटीबीपीचे जवान

0
34

उत्तराखंडमध्ये संकट कमी होण्याची लक्षणे कुठेही दिसत नाही आहेत. धौलीगंगा नदीपात्रात वाढ झाल्याने अनेक गावांना पुराचा मोठा फटका बसला आहे. नदी परिसरातील जीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीतही आयटीबीपीचे जवान आपले कर्तव्य बजावत आहेत. गरजूंच्या मदतीसाठी ते धावून येत आहेत. जगाशी संपर्क तुटलेल्या गावांच्या ठिकाणी जाऊन लोकांना रिलीफ मटेरियल पुरवत आहेत तसेच त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम आहे आयटीबीपीचे जवान करत आहेत.