सचिन वाझेंच्या व्हॉट्सप स्टेटसमुळे खळबळ ‘आता जगाचा निरोप घेण्याची वेळ आली’

0
42

मनसुख हिरेन या हत्या प्रकरणात चर्चेत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्ष सचिन वाझे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. याच दरम्यान, सचिन वाझे यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवरून खळबळ माजली आहे. त्यांनी स्टेटसवर ‘आता जगाचा निरोप घेण्याची वेळ आली’ असे त्यांनी लिहिले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना फोन करून स्टेटस काढण्यास सांगितले. तरीही त्यांनी ते बदललेले नाही. तसेच त्यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज स्वीकारून न्यायालयाने सुनावणीसाठी 19 मार्चची तारीख दिली आहे. पण, तूर्तास दिलासा देण्यास नकार दिला.